आजचे तरुण पाहतायत मोबाईलवर पाॅर्न : चेतन भगत

दिल्ली , १५ सप्टेंबर २०२० : सध्या भारतात राजकीय चर्चेला जोरदार उधाण आले असून,भारतातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती ही आजच्या परिस्थितीवर भाष्य करत आहेत.अशातच आजच्या तरुणाईमधील प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आजच्या तरुणांवर आपली नाराजी व्यक्त करत भावना मांडल्या आहेत.

भारतीय युवक हे फोनमधे आहेत,ते पाॅर्न बघतायंत,मुर्ख व्हिडियो पाहतायत,व्हिडीयो गेम खेळत आहेत,सोशल मिडीयावर ऐकमेकांशी भांडत आहेत.मात्र अर्थव्यवस्थेचे वाईट हाल होत आहेत त्याकडे युवकांचे लक्ष्य नाही.असे चेतन भगत म्हणाले. त्यामुळे आता युवकांनी फोन बंद करावेत आणि सरकारला प्रश्न विचारावे असे आवाहान केले.

तसेच पुढे चेतन भगत यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना जीडीपी मधे २३.९ टक्के घसरण झाल्याचे ही विधान करत खंत व्यक्त केली.तर आजच्या तरुणवर्गाला त्यांनी जागृत होण्याचा संदेश दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा