टोलनाक्यांवरुन टोल घेणे काही काळासाठी बंद

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. संचार बंदी, लॉक डाउन सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांवरुन टोल घेणे काही काळासाठी बंद करत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपत्कालीन प्रसंगात काम करणं सोपं व्हावं यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर केली आहे.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणं तात्पुरत्या स्वरुपात बंद केलं आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळं वाचू शकेल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा