वॉशिंग्टन, ३१ डिसेंबर २०२०: हॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता टॉम क्रूझ आपल्या पुढच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी परत आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना टॉम क्रूझने शूटिंगसाठी पुनरागमन केले आहे. टॉम हा त्याच्या चित्रपटाचा निर्माता असला तरी तो त्याच्या कलाकारांचे आणि चित्रपटाच्या कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
काही दिवसांपूर्वी टॉम क्रूझने त्याच्या चित्रपटाच्या दोन कर्मचार्यांना जवळ उभे राहिल्याबद्दल ओरडले होते. कारण ते कोरोना विषाणच्या प्रादुर्भामुळे ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत नव्हते. टॉम क्रूझ यांनी कर्मचार्यांना फटकारले आणि चित्रपटामधून काढून टाकण्याविषयी बोलले. या घटनेची संपूर्ण ऑडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली. याचा परिणाम असा झाला की टॉम क्रूझचे ओरडणे कर्मचार्यांना सहन झाले नाही आणि दोन दिवसानंतर चित्रपटाच्या पाच कर्मचार्यांनी काम सोडले.
कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनचा शेवट झाल्यापासून टॉम क्रूझने आपल्या “मिशन इम्पॉसिबल 7” या चित्रपटाची शूटिंग सुरू केली. आणि व्हायरसमुळे त्याच्या कामात सारखा अडथळा निर्माण झाला आहे. तो इटलीमध्ये आपल्या संपूर्ण टीमसह चित्रपटाचे शूटिंग करत असताना, त्याच्या चित्रपटाच्या १२ सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. यामुळे चित्रपटाचे काम थांबवावे लागले आणि निर्मात्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. टॉम क्रूझरा कोरोना विषाणू मुळे चित्रपटाचे नुकसान होऊ नये अशी इच्छा आहे, म्हणूनच चित्रपटाचे निर्माता म्हणून त्याला या समस्येचा सामना करावा लागतोय.
टॉमने कोरोना व्हायरस डोळ्यासमोर ठेवून “मिशन इम्पॉसिबल 7” या चित्रपटाच्या अभिनेता आणि कर्मचार्यांसाठी सर्व आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यांनी आपल्या कर्मचार्यांना राहण्यासाठी एका क्रुजची व्यवस्था केली आहे जेणेकरून त्यांना साथीच्या रोगाचा स्पर्शही होणार नाही. पण, जेव्हा सेटवर सोशल डिन्स्टंसिंगचे उल्लंघन केल्याचे पाहिले तेव्हा तो सहन करू शकत नाहीये आणि त्याने आपल्या कर्मचार्यांना अनेकदा या विषयावर फटकारले आहे. त्यानंतर थोड्या दिवसांनी बातमी आली की टॉम ख्रिसमस साजरा करण्यासाठी चित्रपटाचे काम थांबवून आपल्या मुलासह बाहेर गेला.
आता ख्रिसमस संपल्यानंतर टॉम क्रूझ पुन्हा “मिशन इम्पॉसिबल 7” या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी परत आला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण यापूर्वीच यूके मध्ये झाले होते परंतु स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्स यांच्या मालकीचा होता. पण, आता त्याने लाँगक्रॉस फिल्म स्टुडिओत आपल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट पूर्णत्वाच्या जवळ आला असून हे त्याचे अंतिम वेळापत्रक असेल असे सांगितले जात आहे. ख्रिस्तोफर मॅकक्वेरी दिग्दर्शित हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव