टोमॅटोला हात लावला तर मार खाशील…

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये महागाईचा चांगलाच आगडोंब उसळला आहे. टॉमॅटोने तर चांगलाच ‘भाव’ खाल्ला आहे. टोमॅटोला प्रति किलोला ३०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तानात टॉमॅटोला सोन्याचा भाव मिळत आहे असेच म्हणावे लागेल.
टॉमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने एका नववधुने टोमॅटोचेच दागिने आपल्या लग्नात परिधान केले आहेत. ही बाब एका पत्रकाराला समजताच त्याने लग्न मंडपात धाव घेतली.

पाकिस्तानी नववधूने सोन्याच्या दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घातले होते. पत्रकाराशी संवाद साधताना नववधू म्हणाली की, सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. टॉमॅटोचेही भाव वधारले आहेत. म्हणून मी माझ्या लग्नात सोन्याचे दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घातले आहेत.

पत्रकाराने सहज त्या टॉमॅटोला हात लावला तर नववधू चिडली आणि पत्रकारला म्हणाली माझ्या टॉमॅटोला हात लावलास तर मारीन. इतकेच नव्हे तर वधुच्या पालकांनी नवर्‍या मुलाला हुंड्यात तीन पेट्या टॉमॅटो दिल्या आहेत. या मुलाखातीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा