मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: कंगना राणावत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातला शाब्दिक वाद चांगलाच रंगला आहे. आता या वादात बीएमसीनेही हस्तक्षेप केल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी आज कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये पाहणीसाठी गेले. त्यानंतर कंगना ने व्हिडिओ पोस्ट करत बीएमसी वर भलतेच आरोप केले आहेत.
कंगना ने ट्विट केले आहे त्या ट्विट मध्ये ती म्हणते, “बीएमसीचे काही अधिकारी आपल्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले आणि ते उद्या हे कार्यालय तोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा कंगनाने केला आहे. ‘मुंबईतील हे मणिकर्णिका चित्रपटाचे कार्यालय आहे. हे कार्यालय मी पंधरा वर्ष मेहनत करून कमावले आहे. आयुष्यात माझे एकच स्वप्न होते, की जेव्हा मी चित्रपट निर्माती बनेन तेव्हा माझे स्वतःचे एक कार्यालय असेल. मात्र, हे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे, असे वाटते. आज तेथे अचानक बीएमसीचे लोक आले आहेत.’ असे कंगनाने ट्विट करत सांगितले आहे.
तसेच, दुसऱ्या ट्विट मध्ये कंगना राणावत हिने बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांवर शिवीगाळ केल्याचा दावा देखील कंगनाने केला आहे. पुढे ती म्हणाली काल बीएमसीने माझ्या कार्यालयावर छापा टाकला, उद्या ते नोटीस न देताच संपूर्ण स्ट्रक्चर तोडतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे