नाशिक, ०८ ऑगस्ट २०२२: नाशिक जिल्हामध्ये अचानक जोरदार पाऊस झाला आहे. यावेळी दुगारवाडी धबधब्यावर पर्यटक फिरण्यासाठी खुप प्रमाणात आले होते. रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटक जास्त प्रमाणात आले होते. पण अचानक पाऊसाचा जोर वाढल्याने पर्यटकांची एकच कोंडी झाली.
यामुळे २० हून अधिक पर्यटक अडकले होते. पाऊस जोरात चालु असल्यामुळे धबधब्यावरुन बाहेर पडणे अवघड झाले होते. यावेळी अडकलेल्या पर्यटकांपैकी एकजण वाहून गेला. अविनाश गरड वय ४० हा व्यक्ती वाहून गेला असून त्याचा शोध सूरु आहे.
पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा पर्यंत पर्यटकांना रेस्क्यू करण्याची कारवाई सूरु होती. रात्रभर बचाव मोहीम राबवून सर्व पर्यटकांना सुकरुप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. भर पावसात दहा तास रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.
मात्र एक पर्यटक वाहून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विषेश म्हणजे गोदा काठावर पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या वाहनांचं प्रचंड नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने वाहने बाहेर काढण्यात आली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर