पर्यंटकांनो नियमांचे पालन करा जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

पुणे १४ जुलै २०२२:जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला गुरुवारी मुसळधार पावसाचा लाल इशारा दिला आहे तर शुकवारी नांरगी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्हातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना काळजी घेण्याची आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाण लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मेढेघाट आदी ठिकाणी फिरायला जाताना काळजी घेण्याची आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नियमांचे पालन न करण्यावंर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन जीव गमावल्याच्या किव्हा जखमी झाल्याचा घटना पावसाळ्यात वारंवार घडतात. भुशी धरणात अनेकांनी आपला जीव गमवला आहे. लोहगड भागात पावसाळ्यात धुके पसरलेले असते. तसेच वाढलेल्या गवतांमुले पायवाटा झाकल्या जातात.

माळशेज घाट परीसरात अनेक धबधबे असून धबधब्याच्या पाण्यात उतरल्याने किव्हा घाटात अपघात होण्याची शक्यता असते. संकटकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा जिल्ह्यात संकटकाळी १०७७ या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षात कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

‌न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा