वाघीण-बछड्यांचा रस्ता अडवल्याने पर्यटकांना उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात कायमची बंदी

नागपूर, ७ जानेवारी २०२५ : विदर्भातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग दोन्ही बाजूने अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, वनविभागाने मोठी कारवाई केलीय.

या घटनेत सहभागी चार जीप्सी चालक आणि निसर्ग मार्गदर्शकांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांनी कळवले आहे. जिप्सी चालकांना २५ हजार रूपयांचा तर निसर्ग मार्गदर्शकांना प्रत्येकी १ हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यटकांना कायमची बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आलंय.

न्युज अनकट प्रतिनीधी : भाग्यश्री शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा