विशाखापट्टणम, दि. ७ मे २०२०: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील फार्मा कंपनीत गॅस गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. स्थिती अद्याप नियंत्रणात नाही. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील गावे रिकामी केली आहेत.
आर आर वेंकटापूरममध्ये असलेल्या विशाखा एलजी पॉलिमर कंपनीकडून धोकादायक विषारी वायूची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विषारी वायूमुळे कारखान्याच्या तीन किलोमीटर भाग बाधित आहे. या क्षणी पाच गावे रिकामी करण्यात आली. शेकडो लोका डोकेदुखी, उलट्या आणि श्वासनाच्या त्रासामुळे रुग्णालयात पोहोचत आहेत.
आठ लोकांचा मृत्यू, २० जणांची प्रकृती गंभीर
शासकीय रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मुख्यतः वृद्ध आणि मुले आहेत. असे म्हटले जात आहे की १५०-१७० लोकांना शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले आहे. या व्यतिरिक्त बर्याच लोकांना गोपाळपुरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. १५००-२००० बेडची व्यवस्था केली गेली आहे.
तथापि, गॅस गळतीचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या विशाखापट्टणमचे जिल्हा दंडाधिकारी विनय चंद हे घटनास्थळी पोहचले आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणतात की दोन तासाच्या आत ही स्थिती नियंत्रणात आणली गेली. काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यांना ऑक्सिजनचा आधार दिला जात आहे.
याप्रसंगी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकेही तैनात करण्यात आल्या असून लोकांना गावातून बाहेर काढण्यात येत आहे. पोलिस अधिका-यांनी लोकांना घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाधित भागात जाऊ नये असे आवाहनही केले जात आहे.
हिंदुस्तान पॉलिमर्सच्या नावाने १९५१ मध्ये एलजी पॉलिमर इंडस्ट्रीची स्थापना झाली. कंपनी पॉलिस्टीरिन आणि त्याचे को-पॉलिमर तयार करते. हिंदुस्तान पॉलिमरचे १९७८ मध्ये यूबी समूहाच्या मॅकडॉवल अँड कंपनी लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाले आणि नंतर ते एलजी पॉलिमर उद्योग बनले.
न्यूज अनकट प्रतिनिधी