टोयोटाच्या कार्स महागणार, Urban Cruiser आणि Glanzaच्या किमती वाढणार

नवी दिल्ली, 1 मे 2022: जपानी कार कंपनी टोयोटा (Toyota Kirloskar Motor) च्या गाड्या महाग होणार आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या दोन लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती 1 मे 2022 पासून वाढतील.

खर्च वाढीचा प्रभाव

टोयोटाने अधिकृत निवेदनात म्हटलय की, पूर्वी वाहनांच्या किमतीत वाढ झालीय. या वाढलेल्या किमतीचा काही भाग ग्राहकांवर टाकला जात आहे, त्यामुळं गाड्यांच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. मात्र, कंपनीने कोणत्या मॉडेलची किंमत वाढवणार आहे हे स्पष्ट केलेलं नाही.

मारुती तयार करते Urban Cruiser, Glanza

टोयोटाचा मारुती सुझुकी इंडियासोबत करार आहे. या अंतर्गत मारुती कंपनी Urban Cruiser आणि Glanza तयार करते. खरे तर, अर्बन क्रूझर ही मारुतीच्या विटारा ब्रेझा आणि ग्लान्झा मारुतीच्या बलेनोची री-बॅज केलेली आवृत्ती आहे. यामध्ये अर्बन क्रूझर ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, तर ग्लान्झा ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणीतील कार आहे.

सध्या, टोयोटा अर्बन क्रूझरची किंमत रु. 8.87 लाख आणि टोयोटा ग्लॅन्झाची किंमत रु. 6.39 लाखांपासून सुरू होते.

टोयोटाने 20 लाख विकली वाहने

दरम्यान, टोयोटाने भारतात आपला व्यवसाय सुरू केल्यापासून आतापर्यंत कंपनीने 20 लाख कार विकल्या असल्याची माहितीही दिली आहे. कंपनीने तिरुचिरापल्ली, केरळ येथील ग्राहकाला आपली 20 लाखवी कार डिलिव्हर केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा