आता टोयोटा आणणार ग्लॅन्झाचे सीएनजी व्हेरिएंट

पुणे, 23 मार्च 2022: भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सीएनजी कारची शर्यत अधिक तीव्र होताना दिसत आहे. याचे कारण पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव. याच कारणामुळे ऑटोमोबाईल कंपन्या बिनदिक्कतपणे सीएनजी कार बाजारात आणत आहेत. आता नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार टोयोटा देखील या शर्यतीत सामील होणार आहे. कंपनी आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार Glanza चे CNG व्हेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

जाणून घ्या किती असेल मायलेज

टोयोटा किर्लोस्कर मोटरने यापूर्वीच आपल्या वेबसाइटद्वारे ग्लान्झा सीएनजीबद्दल संकेत दिले आहेत. कंपनीने सांगितले होते की नवीन Glanza CNG चे मायलेज 25Km/Kg असू शकते. कंपनीने नंतर पोस्ट काढून टाकली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी CNG व्हेरिएंटचे नाव Toyota Glanza e-CNG असेल.

नवीन कार कधी लाँच होणार

ऑटोमोबाईल कंपनीने ग्लान्झा ई-सीएनजीच्या लॉन्च तारखेबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, कंपनी पुढील काही महिन्यांत ही कार बाजारात आणण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या या कारशी संबंधित फीचर्सबद्दल

टोयोटाची ग्लान्झा ही मारुती सुझुकीच्या बलेनोवर आधारित आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, टोयोटा के-सीरीज इंजिनसह Glanza e-CNG बाजारात आणू शकते. नुकत्याच लाँच झालेल्या Glanza 2022 मधील हे इंजिन आहे.

किंमत किती असेल

Toyota Kirloskar Motor ने नुकत्याच लाँच केलेल्या Toyota Glanza 2022 ची एक्स-शोरूम किंमत 6.39 लाख रुपये निश्चित केली आहे. आता आगामी सीएनजी व्हेरियंटची किंमत थोडी जास्त असेल अशी अपेक्षा आहे. ही कार पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 70,000 रुपये महाग असू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा