अंबड तालुक्यातील दोदडगाव खदानी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रॉली आणि जेसीबी जप्त

जालना २ फेब्रुवारी २०२४ : जालन्यातल्या अंबड तालुक्यातील दोदडगाव खदानी शिवारात असलेल्या अवैध वाळू साठ्यावर जेसीबीद्वारे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना गोंदी पोलिसांनी १९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मौजे दोदडगाव येथे खदान मारोती मंदीर शिवारात गौण खणिज वाळुचे ढिग असलेल्या ठिकाणी JCBच्या साहयाने ट्रॅक्टरमध्ये गौणखणिज वाळु भरुन तिची चोरटी विक्री करण्यासाठी नेत असल्याची माहिती गोंदी पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळाली होती.

त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता तेथे एक JCB व एक ट्रॉली असलेले ट्रॅक्टर त्यामध्ये वाळु भरलेली व त्या दोन्ही वाहनांचे चालक मिळुन आले. पोलिसांनी त्यांना नाव गाव विचारले असता JCB चालकाने त्याचे नाव ज्ञानेश्वर भगवान वाघ रा. दोडगाव ता. अंबड जि. जालना आणि टॅक्टरचे चालकाने त्याचे नाव शाहेद कासम पठाण वय ३८ वर्ष रा. डोणगाव ता. अंबड जि. जालना असे सांगीतले. त्यांच्याकडे रॉयल्टीची मागणी केला असता त्यांनी नसल्याचे सांगीतले.

त्यांचे ताब्यातील पंधरा लाख रुपये किंमतीचे जेसीबी आणि चार लाख किमतीचा ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीमधील एक ब्रास वाळू पंचनामा करुन एकुण १९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस वसाहत गोंदी येथे लावण्यात आले आहे. जेसीबी चालक/मालक व ट्रक्टर चालक/मालक यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणीही अवैध वाळुची वाहतुक, चोरटी विक्री करु नये असे गोंदी पोलिसांनाकडून अवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा