बारामती शहरात पार्किंग वरून व्यापारी संतप्त

बारामती, दि. २२ जून २०२०: बारामती शहरातील पार्किंग झोनला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर आज रविवारी पोलीस प्रशासनाने तीन हत्ती चौक , भिगवण चौक ते इंदापुर चौकात चार चाकी व दुचाकी पार्किंग न करता गणेश भाजी मंडई पार्किंग येथे करावी अशी सूचना पोलीस प्रशासन देत असताना सिनेमा रोडच्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय मान्य नसल्याचे व कोरोनाने आधीच मोठे नुकसान झाले आहे म्हणत हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत विरोध केला.

बारामती शहरातील पार्किंगचा नवीन आराखडा जाहीर झाल्यावर बारामती शहराच्या आरक्षित ठिकाणी पार्किंग झोन केला आहे. बारामती शहरातील मारवाड पेठ व सिनेमा रस्त्यावर सम विषम पार्किंग असे ठरले असताना आज वाहतूक पोलीस निरीक्षक धान्याकुमार गोडसे यांनी तीन हत्ती चौक भिगवण चौक ते इंदापुर चौक येथे चारचाकी व दुचाकी गाडी पार्क करता येणार नाही, या सर्व गाड्या गणेश भाजी मंडई येथे पार्क काराव्यात अशा सूचना आज दिल्या.

या सूचना देत असताना सिनेमा रोडच्या सर्व व्यापा-यांनी याचा विरोध केला. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक धान्याकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, नरेंद्र मोता सुशील सोमाणी, प्रफुल्ल आहुजा, दीपक मुथा, निलेश कोठारी, यांनी पोलीस प्रशासणाशी चर्चा केली व आज दुपारी मुख्याधिकारी पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून या विषयी मार्ग काढू असे व्यापाऱ्यांना आश्वासन देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा