रत्नागिरी मधील कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

रत्नागिरी, ११ सप्टेंबर २०२३ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात येण्यासाठी एकेरी वाहतूक आज पासून सुरू करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गांवरील अवजड असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्यातून लहान वाहनांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांचे अंतर सुमारे पाऊण तास कमी होऊन अवघ्या तीन मिनिटापर्यंत कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रहदारी आणि अपघाताचे प्रमाण देखील यामुळे कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कशेडी बोगद्याच्या एका लेन मधून वाहतूक सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे.

कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बोगद्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी असलेला मार्ग असल्यामुळे चाकरमानी व पर्यटक यांचा वाया जाणारा वेळ आणि प्रवासात येणारा थकवा कमी होणार आहे. पाऊण तासांचे अंतर अवघ्या तीन मिनिटांत पार होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कशेडी बोगद्याच्या एका लेन मधून होणारी वाहतूक अखेर गणेशोत्सवापूर्वी सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा