कर्जत तालुक्यातील डाॅक्टर प्रशांत जगताप यांचे दु:खद निधन

कर्जत, ५ ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील कुळधरणचे युवा डॉ. प्रशांत प्रमोद जगताप यांचे दुर्दैवी निधन झाले. नगर येथे ते कोरोना रुग्णाची सेवा करत होते. ते काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. नगर येथील साईदीप हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.

नगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये कोरोना सेंटर मधील कोरोना रुग्णांवर ते गेल्या अनेक दिवसापासून उपचार करत होते. मात्र तेथेच त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. प्रथम त्यांच्यावर मॅक्सकेअर मध्ये उपचार करण्यात आले नंतर त्यांना साईदीप हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. काही दिवसांपूर्वी ते कोरोना मुक्त झाले होते मात्र इतर आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने कुळधरणसह कर्जत तालुक्यावर शोककळा पसरली असून तालुक्यातील दोन डॉक्टरांचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा