‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, मनोज बाजपेयी दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई,९ मे २०२३: मनोज बाजपेयीचा आगामी चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चा रोमांचक आणि पॉवर पॅक्ड ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट आसाराम बापूंची संबंधित बलात्कार प्रकरणात न्याय मिळवलेल्या वकिल पीसी सीलंकीवर आधारित आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे.पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या सर्वात मोठ्या कायदेशीर कोर्टरूम ड्रामापैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. हा चित्रपट २३ मे २०२३ रोजी केवळ ZEE5 वर प्रदर्शित होईल.

“सिर्फ एक बंदा काफी है” हा चित्रपट सत्याची लढाई जिंकण्यासाठी सामान्य माणसाच्या विलक्षण शोधाची कथा आहे. सामान्य माणसाची इच्छा आणि स्वयंभू गॉडमनची शक्ती यांच्यातील लढाईत नेहमीच इच्छाशक्तीचा विजय होतो हे चित्रपट दाखवतो. एका साईन बोर्ड ने चित्रपटाचा ट्रेलर ची सुरुवात होते ज्यामध्ये आसाराम बापू बलात्कार प्रकरणातील पीडितेचा खटला लढणाऱ्या पीसी सोलंकी चे नाव दिसते. मनोज बाजपेयींच्या एका डायलॉग्स आहे या ट्रेलर मध्ये समावेश आहे.

मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत

चित्रपटात मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, ‘सिर्फ एक बंदा कोफी है’ मध्ये पीसी सोलंकीची भूमिका साकारणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता कारण ही सत्य आणि न्यायासाठी सर्व संकटांशी लढणाऱ्या सामान्य माणसाची प्रेरणादायी कथा आहे. आज ट्रेलर रिलीज झाल्यामुळे, मला आशा आहे की तो प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि त्यांना ही विजयाची कहाणी आणि पीसी सोलंकीसाठी त्यांनी काय साध्य केले हे पाहण्यास भाग पाडेल.

https://www.instagram.com/reel/Cr-Z81SISLb/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून काय आहे चित्रपट?

दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की म्हणतो, ‘सिर्फ एक बंदा कोफी है’ हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास असेल कारण या चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत काम करताना मला खूप अभिमानास्पद वाटत आहे. मी आनंदी आहे. मला वाटतं मनोज सरांची ही एक उत्तम कामगिरी आहे आणि त्यांनी एका सामान्य माणसाचा असाधारण लढा अतिशय उत्तमरित्या चित्रित केला आहे. त्यांची ही भूमिका दीर्घकाळ स्मरणात राहील. सुपर्ण सर आणि विनोद सरांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मला हे सर्व करता आले असे म्हणत त्या दोघांचे अपूर्व सिंग कारकी यांनी आभारही मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा