बारामती ३ ऑक्टोंबर २०२०: केडगाव महाराष्ट्र शासन ,कृषि विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विज्ञान केंद्र,बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील पारगाव येथे स्वच्छ काकवी व गूळ उत्पादनाचे प्रशिक्षण झाले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे व राजेंद्र साबळे प्रकल्प संचालक, आत्मा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर व मंडळ कृषि अधिकारी राहू कार्यालय यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमात आर्या उद्योग समुहाचे अक्षय करे यांनी गुळ उत्पादनाबाबत सखोल मार्गदर्शन केलं, कृषिभूषण वसुधा सरदार यांनी सामूहिक पध्दतीने गुळाचे ब्रँडिंग कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
पारगावाचे प्रगतशील व सेंद्रीय गुळ उत्पादक शेतकरी कांतीलाल रणदिवे यांनी गूळ व काकवी उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे डॉ. मिलिंद जोशी ऊस पीक गटशेती, गुळाचे मूल्यवर्धन साखळी याबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सयाजी ताकवणे, पोपटभाई ताकवणे, वसुधाताई सरदार डॉ. मिलिंद जोशी, मंडळ कृषी अधिकारी कैलास चव्हाण, संजय फराटे, कृषी सहायक अंबादास झगडे, विशाल बारवकर, संध्या आखाडे, सचिन लोणकर, तुकाराम रडे, शेतकरी मित्र ईश्वर वाघ , अस्लम शेख, बापू टुले, राजेंद्र भागवत, संतोष थोरात, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशांत गावडे, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव