पुरंदर, १ नोव्हेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी या पोलीस स्टेशन मधील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या काल जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं आता पुरंदर मध्ये सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये नवा राजा नवा कायदा होणार की पूर्वीच्या अधिकारांच्या पावलावर पाऊल ठेवत अधिकारी तसेच काम पुढे ही करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डीएस हाके यांचीआर्थिक गुन्हे शाखा मध्ये बदली करण्यात आली आहे. जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची सोलापूर मध्ये बदली करण्यात आली आहे. जेजुरी पोलिस स्टेशनचे विजय वाघमारे यांची दौंड येथे बदली करण्यात आली आहे. सासवडमध्ये अण्णासाहेब घोलप हे बारामतीहून सासवडमध्ये बदली होऊन आले आहेत. जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दौंड येथे कार्यरत असलेले सुनील दशरथ महाडिक हे बदली होऊन आले आहेत.
पुरंदर तालुक्यात बदली होऊन आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं चांगलं काम पुढं नेहण्याचं मोठौ आव्हान आहे. पुरंदर तालुक्यामधील जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांचं काम उल्लेखनीय होतं. कोरोना काळात तसेच गावातील यात्रा जत्रा या काळात अंकुश माने यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर जेजुरी परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यात त्यांना मोठं यश आलं होतं. आता हेच काम पुढं नेण्याचं गुन्हेगारी व अवैध व्यवसाय वाढू न देण्याचं मोठं आव्हान नवीन आलेल्या अधिकाऱ्यांकडं असणार आहे.
सासवडमध्ये सुद्धा गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं काम पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी चांगल्या प्रकारे केलं होतं. पुणे शहराला लागूनच सासवड शहर असल्याने या भागातील गुन्हेगारी सासवडमध्ये येताना पाहायला मिळते. आपल्या कार्यकाळामध्ये डी.एस.हाके यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळं अशाप्रकारे मागील पोलीस अधिकाऱ्यांचे चांगले काम पुढे नेहण्याचे मोठे आव्हान नवीन आलेल्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे