प्रवाश्यांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस पलटली, १२ प्रवासी जखमी, वाशिम जिल्ह्यातील दुर्घटना

23

वाशिम, २२ ऑक्टोबर २०२२ : दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र सुरू आहे. दिवाळी शुक्रवारपासूनच सुरूवात झाली आहे. नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर गावी असणाऱ्या अनेकांनी घराकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच प्रवाशांची एसटी आणि खासगी बसमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आता वाशिम जिल्ह्यात एक अपघाताची घटना घडली आहे.

नागपूरवरून परभणीला जाणाऱ्या भरधाव बसचा अपघात झाला आहे. शब्रिज ट्रॅव्हल्सची ही बस आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात हा अपघात झाला आहे. चौकात बस पलटी झाल्याने बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासा दरम्यान बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे समजते. अपघातानंतर जखमी झालेल्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या कडून उपचार सुरू आहेत.

दैवबलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. या घटने नंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. दिवाळी सनामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात आहेत. मात्र, परिवहन खात्याकडून आणि पोलिसांकडून चालक आणि त्याच्या सहकाऱ्याची तपासणी करण्यात डोळेझाक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा