केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल नी प्रवास

मुंबई: वारंवार सांगूनही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत अपेक्षित अशी घट झालेली नाही, त्यामुळे आता ठोस पाऊल उचलण्यात आले आहेत. त्यातच करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे.

लोकल ही मुंबईची लाईफलाइन आहे. जर लोकल सेवा बंद केली तर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी येता येणार नाही, म्हणून लोकल तूर्त पूर्णपणे बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे तपासून  रेल्वे स्टेशनवर सोडण्यात येणार असून अन्य प्रवाशांना स्टेशनबाहेरच रोखण्यात येईल, असे शनिवारी रात्री कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांची ओळखपत्रे तपासूनच त्यांना आत  सोडले जात आहे. स्थानकावर रेल्वे पोलिस तैनात असून सकाळपासूनच  स्थानकात येणाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जात आहेत. वारंवार सांगूनही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत अपेक्षित अशी घट झालेली नाही, त्यामुळे आता ठोस पाऊल उचलण्यात आले आहेत.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, नोएडा, लखनऊ, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरात लॉक डाऊन सारखी स्थिती आहे. अनेक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. बस सेवा, टॅक्सी सेवा आणि रेल्वे देखील बंद राहणार आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा