रोहा, रायगड ८ जुलै २०२४ : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे, ग्रुप ग्रामपंचायत वरसे, सुदर्शन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तसेच श्री धावीर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. जवळजवळ ५० विविध प्रकारची शेकडो झाडे क्रीडांगणाच्या आसपासच्या परिसरात लावण्यात आली.
या झाडांची योग्य जोपासना करून ती झाडे कशी जगवता येतील याची शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मोहिते ,उपसरपंच स्वप्नाली पाटील, सदस्य शांतीशिल तांबे ,उतेश पडवळ,आतेश कांबळे,किशोर पाटील, उद्योजक रामचंद्र नाकती, माजी सरपंच नरेश पाटील, सुदर्शन केमिकल चे पाटील, सुदर्शन केमिकल चे श्री घरात तसेच श्री धावीर क्रिकेट असोसिएशनचे रवींद्र चाळके, सुमित वाडकर हे उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर