उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडीत वृक्षारोपण

पुरंदर, दि. २२ जुलै २०२०: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. अजित पवार यांचा सर्वात आवडता विषय म्हणजेच वृक्षारोपण, त्यामुळे एकाच दिवशी १०० झाडे लावत पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी गावाने एक आगळावेगळा उपक्रम करत राबवला. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वेळात व मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित वाढदिवस साजरा केला.

पुरंदर तालुक्यातील सर्वात छोटे गाव असलेल्या कर्नलवाडीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस योग्य प्रकारची १०० झाडे लावून साजरा करण्यात आला. वृक्षारोपण समयी सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पूरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे-पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक डॉ. प्रो. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा काँग्रेसचे नंदुकाका जगताप, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, बारामतीचे विक्रम भोसले, भैय्यासाहेब खटपे आदी उपस्थित होते. ज्युबलियंट भारतीय फाउंडेशनने ५० व पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे मित्र परिवार यांनी ५० झाडे उपलब्ध करून दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडीत वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. मागील आठवड्याभर कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, उपसरपंच विकास कर्णवर, सदस्य धनराज कोंडे, पृथ्वीराज निगडे, कर्नलवाडीचे माजी सरपंच लक्ष्मण वाघापुरे, माजी उपसरपंच भरत निगडे, किरण गदादे, नंदकुमार निगडे, ज्योतीराम कर्णवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नलवाचे अध्यक्ष बापुराव भोसले, आदेश निगडे यांसह राष्ट्रवादीचे युवक व विध्यर्थी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा