गोल पोस्ट समाजकारण ओमराजे सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड

ओमराजे सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड

कुर्डूवाडी,६ जुलै २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील ओमराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसाई कॉलनी येथे वृक्ष लागवड करण्यात आली

याप्रसंगी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती व शक्ती तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

या मध्ये पिंपळ,वड,कारंज, परिजातक,गुलमोहर,चिंच या जातीच्या रोपांचा सामावेश असल्याचे सांगत संस्थापक अध्यक्ष संदीप भराटे यांनी वृक्ष लागवडीचे महत्व सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी गणेश व्यवहारे रविकिरण कदम, डॉ.शशिकांत त्रिंबके, डॉ.हेमंत काळे, डॉ.प्रशांत नलावडे, डॉ.कैलास शेंडे, लक्ष्मण बागल,दत्ता काकडे ,संभाजी सातव संजय गोरेे आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version