आदिवासींची खावटी योजना अद्याप कागदावरच

पालघर, १९ नोव्हेंबर २०२० : कोरोना संकट काळात टाळेबंदी मध्ये उपासमार झालेल्या आदिवासी बांधवांना खावटीची गरज होती. आंदोलनं करून ९ सप्टेंबर ला खावटीचा शासन निर्णय पारित झाला. अखेर आता आदिवासी रोजगारासाठी बाहेर पडला मात्र अजूनही खावटी कागदावरच आहे. श्रमजीवी संघटनेनं काल पालघर तहसील कार्यालयासमोर एक अभिनव कार्यक्रम करून आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

सरकारनं भुकेने मारलं पण निसर्गानं साथ दिली आणि कडूकांद,वरई, नागली, अलकांद इत्यादी खाण्यासाठी निसर्गानं उपलब्ध करून दिलं. आम्हा गरीब आदिवासींसारखी अवस्था बिचाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांची ही असेल असं सांगत आदिवासी श्रमाजीवींनी काल हीच शिदोरी, कंदमुळे दिवाळी भेट म्हणून के सी पाडवी यांना भेट म्हणून पाठवून दिली.

प्रत्येक तहसीलदार कार्यालयात तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी जाऊन ही भेट देऊन ती मंत्र्यांपर्यंत पोहचवावी अशी विनंती केली. काल सर्व तहसिल कार्यालयात ही भेट सुपूर्द केली असली तरी आज संघटनेचे काही प्रतिनिधी मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष आदिवासी विकास मंत्र्यांना ही दिवाळी भेट देणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा