नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२३ : संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होत असून, १९ तारखेला ते नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे. मात्र त्या आधी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. याच दिवशी नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा होईल. योगायोग म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मोदीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरू केले आहे. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १५ दिवस कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमाचा धडाका असणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्षांना यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या कालावधीत चार विधायके संसदेत मांडली जाणार आहे. बुधवारी राज्यसभेने जारी केलेल्या संसदीय निवेदनपत्रातही माहिती देण्यात आली आहे. असं सुत्रांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर