इंदापूर, दि.१५ मे २०२० : इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोंढे वस्तीनजीक दोन मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूरहून माल वाहतूक करणारा पिकअप व्हैन (क्रमांक एम एच १२ एस एफ ३६४५) पाऊस येत असल्याने वाहनातील शेतमाल झाकण्यासाठी थांबला होता. त्यावेळी त्याच दिशेने येणारा मालवाहतूक ट्रक (क्रमांक एम एच ४५ .०८५३) पावसाचा अंदाज न आल्याने पीकअपच्या मागील बाजूस जोरदार धडकला. मागील ट्रक ची धडक एवढी भीषण होती की पीकअप व्हैन रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने यामध्ये मागील वाहनातील चालक किरकोळ जखमी झाला , स्थानिकांनी त्याला तातडीने इंदापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाची गस्त घालणा-या गस्ती पथकाने वेळेत दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोहचेपर्यंत अपघात ग्रस्त वाहन चालक दवाखान्यात गेल्याने त्याचे नावे समजू शकले नाही . तसेच याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात अद्याप अपघाताची कसलीही नोंद झालेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे