गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे चांदणी चौकात ट्रक-पीएमपी बसचा मोठा अपघात; दोन तास वाहतूक विस्कळीत

चांदणी चौकात ट्रक-पीएमपी बसचा मोठा अपघात; दोन तास वाहतूक विस्कळीत

पुणे:२८ जूलै २०२२: पुण्यातील चांदणी चौकात ट्रक-पीएमपी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसचं मोठं नुकसान झाले आहे. चौकातील प्रथमेश इलाईट या बिल्डींगसमोर हा अपघात झाला. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे बेंगलोर हायवेला मिळणाऱ्या रस्त्यावर अपघात झाल्याने बराच काळ हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र अपघातामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या अपघातात मोठी जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती कळताच घठनास्थळी वारजे पोलीस दाखल झाले होते.

पोलिसांनी घठनास्थळाची पाहणी केली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक संथ गतीने सूरु झाली आहे. मात्र अनेकांना पर्यायी रस्त्याचा वापर करा, असं आवाहान पोलिसांकडून करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version