त्यापैकी १२ राज्यांमध्ये ट्रम्प तर १० राज्यांमध्ये जो बायडेन यांना विजय

वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर २०२०: पुढील ४ वर्ष जगातील सर्वात सामर्थ्यशाली देशाचे अध्यक्ष पद कोणाकडे असणार हे अमेरिकेतील नागरिकांनी मतदान करून जाहीर केलं आहे. अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या ४५ व्या कार्यकाळातील मतदान संपलं आहे. या शक्तिशाली पदाची मुख्य स्पर्धा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे आहेत. जर अध्यक्ष ट्रम्प पुन्हा विजयी झाले तर सलग दोनदा अध्यक्ष पद मिळविणारे ते चौथे अध्यक्ष होतील.

हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० राज्यांपैकी २२ राज्यांचे निकाल लागले आहेत. त्यापैकी १२ राज्यांमध्ये ट्रम्प तर १० राज्यांमध्ये जो बायडेन यांना विजय मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण दकोटा आणि उत्तर दकोटा राज्यात विजय झाला आहे. तर कोलोराडो आणि कनेक्टिकट राज्यात जो बायडन विजयी झाले आहेत.

एपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार केंटकी, इंडियाना, ओकलाहोम, टेनेसी आणि वेस्ट वर्जीनिया या राजांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा विजय झाला आहे. तर वेरमोंट, रोड आयलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, मेरिलँडमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांचा विजय झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा