तृप्ती देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल

46

बुलढाणा : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनमध्ये तृप्ती देसाई विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता.

तृप्ती देसाई यांच्या फेसबुकवरून आ.बच्चू कडू यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्रहार जनशक्तीकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. धाड पोलीस ठाण्यात मोहिते यांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात तक्रार दिली.