सत्यशोधक महात्मा लघुचित्रपट समाजाला दिशादर्शक ठरेल : प्रा. शहाजी कांबळे यांचे वक्तव्य

कोल्हापूर, दि,३० नोव्हेंबर २०२३ : सत्यशोधक महात्मा फुले हे वंचितांसाठी सतत झगडणारे लोकनेते होते. त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवरती प्रकाशझोत टाकणारा सत्यशोधक महात्मा हा लघुपट समाजासाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे नेते प्रा. शहाजी कांबळे यांनी केले.ते महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा फुले यांचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित सत्यशोधक महात्मा या लघुचित्रपटाच्या प्रीमिअर शो प्रसंगी बोलत होते.

महात्मा फुले यांचा जीवनपट उलघडणाऱ्या बालकलाकारांना घेऊन निर्माण करण्यात आलेल्या सत्यशोधक महात्मा हा लघुपट पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ प्रस्तुत सत्यशोधक महात्मा या मराठी लघुचित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन मंदार रेळेकर, संगीत राजवीर जाधव, छायाचित्रण अमर पारखे यांनी केले आहे. व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे यांनी काम पाहिले आहे.

कथा, पटकथा, संवाद अनिल म्हमाने यांची तर आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, स्वरा सामंत, पृथ्वीराज वायदंडे, पल्लव गायकवाड, आतिफ काझी, पृथ्वीराज बाबर या बालकलाकारासह डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी, महेश्वर तेटांबे, डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, छाया पाटील, किशोर खोबरे, डॉ. निकिता चांडक, दत्तात्रय गायकवाड, निती उराडे, वर्षा सामंत, प्रिती गायकवाड, सनी गोंधळी, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर यांनी या लघुचित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.

यावेळी कामगार नेते सुरेश केसरकर, प्रा. किसनराव कुराडे, रूपाताई वायदंडे, सतीश माळगे, वसुकाका गुरव, संघसेन जगतकर, अमोल वाघमारे, रघुनाथ ढोक, प्रा. टी. के. सरगर, रंजना सानप यांच्यासह कोल्हापुरातील चित्रपट प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा