गोल पोस्ट महाराष्ट्र तुकाई टेकडीवर वृक्षतोड करून पार्किंगची व्यवस्था; पर्यावरणाचा ऱ्हास प्रशासनाचे दुर्लक्ष

तुकाई टेकडीवर वृक्षतोड करून पार्किंगची व्यवस्था; पर्यावरणाचा ऱ्हास प्रशासनाचे दुर्लक्ष

Tukai Tekdi in Pune showing environmental destruction due to illegal deforestation. A temple is visible on the hilltop, while a highlighted inset image shows barren land with burnt trees and urban buildings in the background. The image represents the impact of encroachment and administrative negligence.

Tukai Tekdi Deforestation and illegal Parking: पुणे आणि फुरसुंगीच्या सीमेवर असलेल्या तुकाई टेकडीवर बेकायदेशीर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लोकांनी झाडे तोडून आणि टेकडी फोडून वाहनांसाठी जागा तयार केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

तुकाई टेकडीवर आधीच अनेक मंदिरे आणि दुकाने बांधण्यात आली आहेत. आता पार्किंगच्या नावाखाली आणखी एक अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला आहे.

फुरसुंगी नगरपरिषदेने या प्रकरणाची दखल घेतली आहे.अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वृक्षतोड करून टेकडी फोडल्याचे आढळून आले. मात्र, हे कृत्य कोणी केले. याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. प्रशासनाने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुकाई टेकडीवरील अतिक्रमणांमुळे परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version