शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा

तुळापूर : शौर्यपीठ तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा संपन्न हजारो शिव- शंभु भक्तांच्या उपस्थित पार पडला. पालखी सोहळा मर्दानी खेळ, रक्तदान असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
या सोहळ्यासाठी खा.छत्रपती संभाजीराजे भोसले, सत्यजित तांबे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, ऑ. अशोकबापू पवार, आमदार नितेश राणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे जि. प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्याभिषेकाचा सोहळा संभाजीराजेंच्या उपस्थित सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तुळापूरच्या विकास कामासाठी सत्यजित तांबे यांनी १० लाख रुपये जाहीर केले तर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी १० लाख रुपये दिले. अनेक मान्यवरांचे मनोगत झाले. त्या नंतर जिजाऊ गौरव पुरस्कार मृणाल कुलकर्णी, शंभुगौरव पुरस्कार पीटर व्हॅन गेट व शंकरराव बोरकर, बहुजन नायक ,पुरस्कार सर्जेराव वाघमारे, तर युवा गौरव पुरस्कार अतिष बारणे व समाजरत्न पुरस्कार ऑ. शंकरमहाराज शेवाळे यांना देण्यात आला. या सोहळ्याचे नियोजन शंभुराज्याभिषेक सोहळा समिती तुळापूर यांनी केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा