तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांच्या खिशाला कात्री! व्हीआयपी पासचे दर दुप्पट.

तुळजाभवानीच्या भाविकांना नवरात्रात मोठा धक्का बसणार आहे! देवीचे दर्शन घेण्यासाठी आता भाविकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मंदिर संस्थानने व्हीआयपी पेड दर्शन पासचे दर थेट दुप्पट केले असून, या निर्णयामुळे भाविकांमध्ये संताप उसळला आहे.

📢 जुने दर:

  • देणगी दर्शन पास: 200 रुपये
  • देणगी दर्शन पास: 500 रुपये
  • स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास (रेफरल पास): 200 रुपये
  • सकाळचे अभिषेक पास संख्या: 300

📢 नवे दर (20 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2025):

  • देणगी दर्शन पास: 300 रुपये
  • देणगी दर्शन पास: 1000 रुपये
  • स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास (रेफरल पास): 500 रुपये
  • सकाळचे अभिषेक पास संख्या: 400

दरवर्षी नवरात्र उत्सवात तुळजापूरला राज्यभरातून तब्बल 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यापैकी किमान एक लाख भाविक व्हीआयपी पेड पास घेऊन देवीचं दर्शन घेतात. मात्र, या वर्षी पासचे दर वाढल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

भाविकांच्या नाराजीचा सूर आधीच उमटायला सुरुवात झाली असून, “देवीचं दर्शन हे श्रद्धेचं प्रकरण आहे, त्याला असा व्यापारी रंग का?” असा सवाल अनेक भक्त विचारताना दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी रहीम शेख धाराशिव