राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष आता अति तीव्र झाल्याचे घडामोडींवरून दिसू लागले आहे. अशात जर वेळीच स्थिर सरकार स्थापन नाही झाले तर काय? करायचे याबाबत समान्यमध्ये अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे.
सरकार स्थापनेवर तोडगा निघाला नाही तर…
● यंदाची विधानसभा येत्या शनिवारी ९ नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे.
● त्यानंतर ‘सस्पेंडेड अॅनिमेशन’मध्ये विधानसभा राहील.
● सर्व पक्षांनी सत्ता स्थापनेस नकार दिल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवल्यास राष्ट्रपती तात्पुरती राष्ट्रपती राजवट लागू करतील.
● महिना-दोन महिने तात्पुरती राष्ट्रपती राजवट लागू असल्यास मुख्य सचिव आणि राष्ट्रपतींच्या हातात सत्ता जाईल.
राष्ट्रपती राजवटीनंतर काय?
● राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाणार तर विधानसभेचे कार्य संसदेकडे जाईल.
● राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे जाणार आहे.
● ६ महिने ते जास्तीत जास्त १ वर्ष ही राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकते.
● एक वर्षांनंतरही राष्ट्रपती राजवट लागू ठेवायची असेल तर तशी निवडणूक आयोगाची परवानगी लागते.
● तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकत नाही.
त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीपणाला लावून प्रयत्न केले जात आहेत.