गोल पोस्ट गुन्हा तुनिशाची आई वनिता शर्मा यांचा शीझान खानवर गंभीर आरोप ; म्हणाल्या ….

तुनिशाची आई वनिता शर्मा यांचा शीझान खानवर गंभीर आरोप ; म्हणाल्या ….

मुंबई, ३० डिसेंबर २०२२ :टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी आणि सहअभिनेता शीजान खानची पोलीस कोठडी आज म्हणजेच शुक्रवारी संपणार आहे. या दरम्यान, तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी पुन्हा एकदा शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझानच्या परिवाराने तुनिषाचा वापर केला. त्याच्या कुटुंबियांनी तिला फसवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचसोबत त्याने तुनिशाच्या हत्येचा संशय व्यक्त केला.

  • इस्लाम स्वीकारण्यासाठी शिझानकडून दबाव

तुनीषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझ्या मुलीला शिझानची आई त्रास देत होती, त्या सगळ्यांनी माझ्या मुलीला काबू केले होते. शिझानने तर तिला लग्नाचे वचन दिले होते. पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.’ तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. आता या प्रकरणाला लव्ह जिहादचे वळण लागण्याची शक्यता आहे.

  • हत्येचा संशय

पुढे त्या म्हणाल्या, गळफास घेतल्यावर मला सेटवरू फोन आला. मी लगेच रिक्षा करून आले. तिला फासावरून उतरवल्यावर लगेच रुग्णवाहिका बोलावली नव्हती. रूग्णवाहिकेला का बोलावले नाही. १५ मिनिटांनी रुग्णवाहिका आली होती. इतका वेळ का लागला. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तुनिषाच्या हत्येसंबंधीत शिझानच्या कुटूंबावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे तुनिषाच्या आईने म्हटले आहे.

  • शीझान खानला ड्रग्जचे व्यसन

तनिषाच्या आईने सांगितले की, शीझान खानला ड्रग्जचे व्यसन होते. तो ड्रग्ज घेत असे. तसेच ब्रेक अप नंतर तुनिषा कायम तणावाखाली असायची. शीजान खानमुळे तुनिषा शर्मा हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागली होती, असा खुलासा देखील तुनिषाच्या आईने यावेळी केला आहे.

  • तुनिषावर उगारला होता हात

त्यासोबतच तुनिषाची आई म्हणाली, ‘त्याच्या आईने तुनीषाला घरात कुत्रा पाळण्याची जबरदस्ती केली होती. मी कुत्र्याला घाबरते तरीही त्यांच्या सांगण्यावरून तुनीषाने घरात कुत्रा पाळला होता. एवढेच नाही तर शिझानने तुनिषावर हात देखील उचलला होता, असा दावा तिच्या आईने केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version