तुर्कस्थान : तुर्कस्तानच्या पूर्वेकडील प्रांतामध्ये ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र हादरा बसला.
या धक्क्यात १८ ठार तर ५०० जखमी या भूकंपाच्या धक्याने परिसरातील काही इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये १८ जण ठार झाले तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.
याबाबत तुर्कस्तानचे गृह मंत्री सुलेमान सोयलू म्हणाले की, भूकंपाचे केंद्र पूर्वेकडील एलाजिग प्रांतातील सिवरिस येथील आहे. भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकले शक्यता वर्तवली आहे.
सरकारने लगेचच मदत सुरू केली आहे.
भूकंपानंतर पुन्हा आफ्टरशॉकचे धक्के जाणवण्याच्या भीतीने लोकांना पडझड झालेल्या इमारतींकडे जाण्यापासून रोखण्यात आले आहे.