मुंबई, २६ ऑक्टोबर २०२०: सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर सक्रिय झालेल्या एनसीबीने टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिकाला ड्रग पेडलरकडून ड्रग्स घेताना रंगेहाथ पकडले गेले. तिने सावधन इंडिया आणि देवों के देव महादेव सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. प्रितिका आणि पेडलर फैजल यांना ५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. प्रितिकाची जामीन याचिका सोमवारी ठेवण्यात आली आहे. एनसीबीला दिलेली कबुली तीने मागे घेतली आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सीबीआयकडे एक खटला सोपविण्यात आला होता. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणे आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगल उघडकीस आल्याने सीबीआय व्यतिरिक्त एनसीबीदेखील या प्रकरणात चौकशी करत आहे.
मुंबईतील वर्सोवा येथे एनसीबीचे अधिकारी दोन ठिकाणी साध्या कपड्यांमध्ये गेले. साध्या कपड्यात जाण्या मागचा हेतू हा होता की ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळीला त्यांचा संशय येऊ नये आणि ठरवलेली मोहीम पूर्ण करणे, जी पूर्ण झाली देखील. एनसीबीच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. तरी हे ऑपरेशन अद्याप सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे