पुणे, दि. १५ जुलै २०२० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा(HSC) निकाल उद्या, १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. हा निकाल www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
उच्च माध्यमिक बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली होती. कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं. दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. आता मात्र बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी