आठ दिवसात उजनी धरणात सव्वादोन टीएमसी पाणी साठा झाला जमा

सोलापूर, दि. २४ जून २०२०: सोलापूर पुणे अहमदनगर या तीन जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी मृग नक्षत्राच्या पावसाने संथ गतीने वाढत आहे. उजनी जलाशय परिसरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने आतापर्यंत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा उजनीत जमा झालेला आहे.

१५ जूनला उजनीच्या उपयुक्त पाण्याची टक्केवारी वजा २२ टक्के होती तर २४ जूनला उपयुक्त पाण्याची टक्केवारी वजा १८.८१ टक्के झाली. दौंड येथून अजूनही २४७० क्‍युसेकने बुजलेली पाण्याची आवक सुरूच आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात पाण्याच्या दोन पाळ्या सुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक योजना उन्हाळ्यात सुद्धा कार्यान्वित होत्या. तसेच सोलापूर सह पंढरपूर सांगोला मंगळवेढा या शहरांना योग्य नियोजनामुळे मुबलक पाणी मिळाले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनीची पाणी पातळी वजा ५८.५७ होती.

उजनीची सद्यस्थिती:

एकूण पाणी पातळी ४८९.४७५ मीटर
एकूण पाणी साठा १५१७.३६ दलघमी
उपयुक्त पाणी साठा वजा २८५.३६ दलघमी
टक्केवारी वजा १८.८१ टक्के
एकूण साठ्याचा टीएमसी ५३.५८
उपयुक्त साठ्याचा टीएमसी वजा १०.०८

दौंडमधून आवक २४७० क्यूसेक.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा