उरुळीकांचन ,दि.२९मे ,२०२० : कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या परप्रांतीय यांना उरुळीकांचन रेल्वे स्टेशनवरून त्याच्या गावी जाण्यासाठी रेल्वेच्या सोयी केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरीकांना चौथ्या टप्यात राज्य व केंद्र शासनाने ने दिलासा देवून महाराष्ट्र राज्यातील नागरीकांसाठी आजतागायत बऱ्याच प्रमाणात रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणुन, हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथून आजपर्यंत जवळपास १२ गाड्या सोडण्यात आल्याचे उरुळी कांचन रेल्वे स्टेशनकडून त्यांच्यासह गावातील सामाजीक व्यक्तीच्या सहकार्याने परराज्यात जाणाऱ्या नागरीकांचे योग्य नियाजेन करुन व सोशल डिस्टसिंंगची काळजी घेवून व नियोजनबध्द आखणी करुन प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सहकार्य करण्यात आलेले आहे.
त्यात मुख्यत्वे उरुळी कांचन रेल्वे कर्मचारी मुख्य वाणिज्य निरीक्षक, बारामती, मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक, उरुळी. पी. एन. कोले, मुख्य माल पर्यवेक्षक, उरुळी. के. ए..खान, बुकिंग पर्यवेक्षक, उरुळी. जी. पी बनसोडे, माल पर्यवेक्षक, उरुळी. एस. आर. चिल्का, मुनीश्वर रजक व इत्यादी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे