वॉशिंग्टन, १८ जून २०२१: भारत सरकारबरोबर सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरचा संघर्ष त्याच्यासाठी एकंदरीत महाग पडताना दिसतोय. गेल्या चार महिन्यांत या अमेरिकन कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे २५ टक्के तोटा झालाय.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की भारत सरकारनं आयटी नियमात बदल केले आहेत, त्यानुसार आता ट्विटरने भारतात आपलं कायदेशीर संरक्षण गमावलं आहे. १६ जून रोजी, ट्विटरने भारतात असलेले कायदेशीर संरक्षण गमावलं आहे आणि आता कोणत्याही तृतीय पक्षाच्या कन्टेन्ट साठी (कोणत्याही वापरकर्त्याने पोस्ट केलेले कन्टेन्ट) आयपीसी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
ट्विटरला मोठं नुकसान
गेल्या तीन-चार महिन्यांत भारत सरकारबरोबर सतत होणाऱ्या वादामुळे ट्विटरला खूप नुकसान सहन करावे लागलंय. बुधवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्विटरचा शेअर जवळपास अर्ध्या टक्क्यांनी घसरून ५९.९३ अमेरिकी डॉलर वर बंद झाला.
यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी ट्विटरचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ८०.७५ डॉलर वर पोहोचले होते. परंतु, त्यानंतर त्यामध्ये सुमारे २५.७८% घट झाली आहे. ट्विटरचे मार्केट कॅप घसरून ४७.६४ अब्ज डॉलरवर गेलेय.
गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी जेव्हा भारत सरकारनं ट्विटरला नोटीस पाठविली होती तेव्हा त्यांनी लडाखऐवजी लेहला जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून का दर्शविले आहे, अशी आक्षेप नोंदविला होता. यानंतर #BanTwitter ने सोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरवात केली.
असं असूनही फेब्रुवारीपर्यंत ट्विटर चे शेअर्स चढत राहिले. यानंतर भारत सरकारनं ट्विटरला शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविणार्या अनेक खात्यांवर बंदी घालण्याची नोटीस पाठविली. आयटी कायद्याच्या कलम ६९A अन्वये ट्विटरनं जर मानकांचे पालन केलं नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं सरकारनं म्हटलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे