गोल पोस्ट गुन्हा दोन गुन्ह्यातला फरार आरोपी आज ताब्यात.

दोन गुन्ह्यातला फरार आरोपी आज ताब्यात.

उस्मानाबाद, ५ ऑगस्ट २०२० :उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यातील संबंधित आरोपी फरार होता. चोरीचा आणि रस्ता अपघाताचा गुन्हा दाखल असलेला आरोपी रूपेश रविंद्र काळे वय वर्ष ४० हा कळंब तालुक्यातील मस्सा येथील रहिवासी आहे. याला पकडण्याकरिता पोलीसांनी नेहमी प्रयत्न केला, परंतु त्याला शोधण्यासाठी ते असमर्थ ठरली.

आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी, संबंधित आरोपीची गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर, त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक लाव्हरेपाटील, डुरंग सावंत यांच्या पथकाने या आरोपीस पकडले. तसेच, त्याला कळंब पोलीस ठाणे च्या ताब्यात दिले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version