पेण, ३१ डिसेंबर २०२०: महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीचे सत्र वाढत असून कायद्याचा धाक आता गुन्हेगारांमधे कमी बसतोय की काय हा प्रश्न आता उपस्थित राहत आहे.महाराष्ट्रातील रायगडच्या पेण तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारीच काय तर त्या पलिकडेही अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एक डाग लागला आहे.
रायगडच्या पेण तालुक्यातून संतापजनक आणि तितकीच ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माळघेर वाडी येथील एका अडीच वर्षाच्या आदिवासी चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हदरला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या आठवड्या भरातच बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत. ज्या वर सरकार गांभीर्याने विचार करत आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.या आधी देखील पुण्यात एका मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. तर या चिमुरडीच्या घटनेवर परिसरातील नागरिकांनी पेण पोलीस ठाण्यात गर्दी केली आसून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव