पाण्याच्या जारमधून हातभट्टी नेणार्‍या दोघांना अटक

हडपसर, दि.२७एप्रिल २०२० : देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, हातभट्टी दारूविक्री करणारे विविध शकलं लढवत आहेत. आज सोमवारी (दि. २७ एप्रिल) सायं. ६:३० च्या सुमारास सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाका येथे दुचाकीवर पाण्याच्या जारमधून दारू घेऊन जाणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन्ही जार जप्त करून दोघांना अटक केल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

बबलूकुमार रोहित माझी, (वय २२) आणि आकाश मनोहर दोडमनी, (वय ३२ ) रा. दोघे झेड कॉर्नर स्कूलच्या पाठीमागे, मांजरी पुणे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाका येथे हडपसर पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. सोमवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून पाण्याचे दोन जार घेऊन जात होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी पाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र जारमधील पण्याचा रंग जरा वेगळा वाटला म्हणून तपास केला असता त्यामध्ये हातभट्टी दारू असल्याचे आढळून आले. तातडीने दोन्ही जार जप्त करून दोघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार राजेश नवले, शरद धांडे, पोपट माने, सचिन हनवते, होमगार्ड लक्ष्मण हजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा