दिल्लीतील भोगल दरोड्याप्रकरणी दोघांना अटक, १२ लाखाच्या रोकडसह १८ किलो सोने जप्त

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर २०२३ : दिल्लीतील भोगल भागात २५ कोटींच्या दरोडाप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी आज बिलासपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू असून एका आरोपींकडून १२.५० लाख रुपये रोख आणि १८ किलो सोने, हिरे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती बिलासपूरचे एसपी संतोष सिंह यांनी दिली.

दिल्लीतील भोगल भागात एका ज्वेलरी दुकानात घुसून तीन जणांनी २५ कोटी रुपयांचे सोने आणि रोकड लुटली होती. देशाच्या राजधानीतील हा सर्वात मोठा दरोडा आहे. आरोपींनी दुकान फोडून २५ कोटींहून अधिक किंमतीचे दागिने तसेच ५ लाखाची रोकड लंपास केली होती.

दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी आतमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते. भोगल येथील उमराव सिंग ज्वेलर्सचे मालक रविवारी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी दुकान बंद होते. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुकान उघडले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा