दोन धमाकेदार चित्रपट येणार समोरासमोर, बॉक्स ऑफिस वर घालणार धुमाकूळ

मुंबई, २८ मार्च २०२३:अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे आणि अजयला धमाकेदार अॅक्शन करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘दृश्यम २ द्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर, बॉलिवूड स्टार अजय देवगण पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी अजय असाच एक धमाका घेऊन येत आहे. अजय देवगणचा नवा चित्रपट ‘भोला’ या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर, गाणी आणि प्रोमोजमुळं लोकांमध्ये “भोला” बद्दल उत्सुकता वाढलीय.

शुक्रवारी ‘भोला’ हा चित्रपटगृहांमध्ये एकमेव नवीन चित्रपट नाही. तेलुगु इंडस्ट्रीतील “दसरा” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘भोला’सोबत टक्कर देईल, ‘दसरा’ ही अशा लोकांची कथा आहे जे स्वतः कोळशाच्या खाणीत काम करतात.श्रीकांत ओडेला दिग्दर्शित या चित्रपटामध्ये नानी आणि कीर्ती सुरेश सारखे मोठे कलाकार आहेत. नानी इंडस्ट्रीतील टॉप स्टार्सपैकी एक आहे. तेलुगू व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये रिलीज होत असलेला’दसरा’ हा नानीचा हिंदी पदार्पण असेल.

‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अजय देवगणच्या चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. ‘भोला’च्या दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्या दिग्दर्शन शैलीचंही खूप कौतुक होत आहे. ‘भोला’ हा फुल ऑन मसाला एंटरटेनर आहे, आणि ट्रेलरमध्ये दिसणारे अॅक्शन सीक्वेन्स कमालीचे आहेत. चित्रपटात व्हिज्युअल्स आणि स्फोटक अॅक्शन यांचा सुरेख मेळ दिसून येतो.

कथेच्या पातळीवरही ‘भोला’ आणि ‘दसरा’ हे चित्रपट एकमेकांना सरस ठरणार आहेत. त्यामुळं हे दोन चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घालताना दिसणार यात शंकाच नाही. हे चित्रपट समोरासमोर आल्यावर कोणता चित्रपट प्रेक्षकांचा विशेष पसंतीस पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा