सीना नदी पाञांमध्ये दोन भावाचा बुडून मृत्यू

7

कर्जत, ९ ऑगस्ट २०२०: सीना नदी ही मुसळधार पावसामुळे वाहती झाली आहे. त्यामुळे शाळकरी मुले हे पोहण्यासाठी नदीकडे आकर्षित होत आहेत. तेजस आणि सिध्दार्थ या दोन शाळकरी मुलांचा सीना नदी पाञांमधेय बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कर्जत तालुक्यातील रातंजन येथील तेजस सुनील काळे वय १५ वर्ष व सिद्धांत विजय काळे वय १६ वर्ष हे दोघेजण नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले असता यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे. तीन ते चारच्या वाजण्याच्या सुमारास रातंजन येथील हे दोन भाऊ सीना नदीत पोहण्यास गेले होते. नदी पाञात बेसुमार वाळू असल्याने वाळू तस्करांनी ती काढल्याने नदी पात्राची खोली ही वीस-पंचवीस फुटापर्यंत गेलेली पाहण्यास मिळत आहे.

नदी मधील उपसलेल्या वाळू मुळे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हे दोघेही खोल पाण्यात बुडाले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना त्यांचा बचाव करता न आल्यामुळे त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माहिती झाल्यानंतर उशिराने  रातंजन येथील तरुणांनी सीना नदीत अर्धा ते एक तास पाण्यात बुड्या घेऊन शोधाशोध करत या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. सदर घटनेचा आढावा घेण्यासाठी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा