तमिळनाडूमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, ४ जण जागीच ठार तर ७० जण जखमी

कुड्डालोर, तामिळनाडू १९ जून २०२३: तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात, चार जण जागीच ठार झाले असून ७० हून अधिक लोक जखमी झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तातडीने, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची रुपयांची मदत जाहीर केली.

कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पम जवळील पट्टमबक्कम येथे हा भीषण अपघात झाला आहे. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बस प्रवास करत होत्या, त्यातील एका बसचा अचानक पुढचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसशी समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही बस बाजूला काढायला दोन क्रेनची सहाय्यता घ्यावी लागली.

यानंतर प्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा जास्त प्रमाणात समावेश असून दोन्ही बसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवाशांच्या शरीरात लोखंडी पत्रा घुसल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झालाय. जखमींमध्ये पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा