गोल पोस्ट महाराष्ट्र इंदापुरात अढळले कोरोनाचे दोन रुग्ण

इंदापुरात अढळले कोरोनाचे दोन रुग्ण

इंदापूर (प्रतिनिधी) दि.१६ मे २०२० : आजतागायत इंदापूर तालूका कोरोनामुक्त होता परंतू आज इंदापूरात दोन कोरोना रुग्ण आढळल्याने इंदापूरने कोरोनाचे खाते उघडले, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली.

इंदापूर तालुक्यात दोन रुग्णांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह.

इदापूर मध्ये आढळून आलेले हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये आई (वय ३५ वर्ष) आणि मुलगी (वय ११ वर्ष) यांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश मोरे यांनी दिली.

चार लोकांचे हे कुटुंब मुंबई येथून त्यांच्या इंदापूर तालुक्यातील मुळ गावी शिरसोडी येथे दोन दिवसा पूर्वी आले होते. त्यांना प्रशासनाने इंदापूर येथील शासकीय वसतिगृहात कॉरंन्टाईन करुन ठेवले होते.काल त्यांचे स्वॅब घेतले होते.त्यातील दोघांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले आहेत. या मुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:योगेश कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version