नागपुरात दोन दिवसीय “राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद” संपन्न

5

नागपूर, १४ फेब्रुवारी २०२४ : विकासार्थ विद्यार्थीद्वारा पर्यावरण गतिविधीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद आयोजित करण्यात आली होती. या पर्यावरण संसदेला देशभरातील विद्यापीठातील १६४ प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव देवणानी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘विकासार्थ विद्यार्थी विद्यार्थ्याला उद्याचा नाही’, तर ‘आजचा विद्यार्थी आजचा नागरिक’ या संकलपनेला मानून पर्यावरण या दोन दिवसीय संसदेमध्ये जलवायू परिवर्तन, प्लास्टिक, नैसर्गिक संसाधनावर हानी अशा अनेक विषयांवर लोकतांत्रिक माध्यमातून चर्चा झाली. यामधील १० विद्यार्थ्यांना उत्तम वक्ता, उत्तम प्रधानमंत्री, उत्तम विरोधी पक्ष नेता असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विकासार्थ विद्यार्थी म्हणून जल संरक्षण या विषयाला घेऊन काम करेल अशी घोषणा विकासार्थ विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संयोजक मयूर जव्हेरी यांनी केली.

या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. केवळ स्वच्छता करून उपयोग नाही. तर कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत कसं करता येईल, यावर युवकांनी विचार केला पाहिजे असे संबोधन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात ईथिक्स इकॉनॉमी, इकॉलॉजी या जीवनातील तीन मंत्रावर प्रकाश टाकला.

यावेळी सुरत महानगरपालिकेच्या आयुक्त शालिनी अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सुरत शहरातील सर्व प्लास्टिक रोडमधे घालून पर्यावरण क्षेत्रात सुरत शहराला कसे अग्रसर केले जात आहे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी मंचावर सेवार्थ विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंयोजक शिल्पा कुमारी, प्रदेश मंत्री पायल किनाके उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा